परभणी, दि. 6 (समाजहित न्यूज वृत्तांत ) : इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे हे दि. 9 मार्च 2025 रोजी परभणी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. दि. 9 मार्च रोजी सकाळी 11.30 वा. छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने जिल्हा परिषद प्रांगण, परभणी येथे आगमन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळा कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. दुपारी 1.30 वा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी परिसरातील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाची ते पाहणी करतील. सोईनुसार वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे ते प्रयाण करतील.

