सोनपेठ (समाजहित न्यूज वृत्तांत ) तालुक्यातील कन्हेगाव येथे जि.प. प्रा. शा. कान्हेगाव शाळेत विद्यार्थ्यांना व्यापारी जीवनाचा व्यवहारिक जीवनाचा अनुभव मिळावा म्हणून आनंदनगरी चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गट करून विविध खाद्यपदार्थाचे तसेच विविध प्रकारचे एकूण 30 स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबत व्यावहारिक जीवनामध्ये कसे वागावे ? नफा तोटा या संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगणे तसेच एक चांगला व्यावसायिक होण्यासाठी काय करावे लागते ? या सर्व गोष्टींचा अनुभव देणे हा मानस देऊन शाळेने हा उपक्रम राबवित आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष दिलीपराव मोकाशे (अध्यक्ष शालेय व्य समिती ), उदघाटक प्रमुख रामेश्वर मोकाशे ( अध्यक्ष संजय गाधी निराधार योजना सोनपेठ ), प्रमुख पाहुणे म्हणून ठुले व्ही के (मुख्याध्यापक ), माणिकराव कोरडे (सरपच), सतीशराव सातपुते (उप सरपंच ), नरहरी दुगाणे (उपाध्यक्ष शा व्य समिती ), शेषेराव मोकाशे ( माजी सरपंच), पांडूरंग कोरडे (शिक्षण तज्ञ शा व्य समिती ), तातेराव मोकाशे ( माजी . उपसरंपच ), माधवराव मोकाशे, बाजीराव मोकाशे, गणेश कोरडे, गणेश मोकाशे, माणिक दुगाणे, अनंत माने, बाळासाहेब माळी, नवनाथ मोकाशे, दत्ता कुलकर्णी, विश्वनाथ मोकाशे, लक्ष्मणराव कोरडे ( अध्यक्ष तंटामुक्ती समिती ), विशाल मोकाशे (पत्रकार दै लोकमत ), ऋतूराज मोकाशे, गजानन मोकाशे व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व पालक याच्या उपस्थित आनंदनगरी संपन्न झाली . on line Payment व off line payment द्वारे 16225 ( सोळा हजार रु ) ची विक्री झाली होती. यावेळी विध्यार्थ्यांनी आनंद नगरी मध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता.

