पालम (समाजहित न्यूज वृत्तांत ) तालुक्यातील फरकंडा येथे आज दि,१३ फेब्रुवारी गुरुवार रोजी जिल्हा प्राथमिक केंद्रीय शाळा फरकंडा शाळेत विद्यार्थ्यांना व्यापारी जीवनाचा व्यवहारिक जीवनाचा अनुभव मिळावा म्हणून आनंदनगरी चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गट करून विविध खाद्यपदार्थाचे तसेच विविध प्रकारचे एकूण 50 स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबत व्यावहारिक जीवनामध्ये कसे वागावे ? नफा तोटा या संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगणे तसेच एक चांगला व्यावसायिक होण्यासाठी काय करावे लागते ? या सर्व गोष्टींचा अनुभव देणे हा मानस देऊन शाळेने हा उपक्रम राबविला आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ पौळ गावातील माजी उपसरपंच, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
शाळेचे मुख्याध्यापक मस्के सर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद नगरीचा हा कार्यक्रम आज रोजी घेण्यात आला यावेळी सर्व शिक्षक पत्की सर, कांबळे सर, गोपाले सर, पौळसर, संदीप कांबळे, करामुंगे मॅडम, वट्टमवार सर, वरील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.


