लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन
पत्रकार आणि सामाजसेवींशी असभ्य वर्तन करणाऱ्या एपीआय महेंद्र शिंदेवर शिस्तभंगाची कारवाई करा!
अकोला (समाजहित न्यूज वृत्तांत ) जाणूटोणा विरोधी कायद्यानुसार तक्रार न नोंदवता लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार संजय देशमुख व समाजसेविका डॉ.स्वप्नाताई लांडे यांचेशी असभ्य, असंविधानिक वर्तवणूक करणाऱ्या एपीआय महेन्द्र शिंदे यांच्यावर शिस्तभंगाची कडक कारवाई करणे बाबत दि. १२/२/२०२५ रोजी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा कार्यकारिणीतर्फे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले.
सौ.सोनल अग्रवाल या महिलेविरूध्द झालेल्या झालेल्या प्रकरणात जादुटोणा विरोधी कायदा २०१३ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यास अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिस स्टेशनमधून नकार देण्यात आला.उलट तेथील कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यानी तक्रारदार महिला आणि तिला सहकार्य करणाऱ्याय व्यक्तींना असभ्य वागणूक देऊन "आम्ही शासनाचे नोकर आहोत,तुमचे नाही", अशाप्रकारे उत्तरे देऊन कर्तव्यात कसूर केलेला आहे.
आठ दिवसांपासून सिव्हील पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात टाळटाळ झालेली आहे. अनेक फोन करूनही येथील ठाणेदार सुनिल किनगे सुध्दा कुणाला भेटले नाहीत.एपीआय शिंदे यांची उर्मट वागणूक, आमचं कोणी काहीच बिघडवू शकत नाही.आम्हाला कायद्यांचे सर्व ज्ञान आहे, हे दाखवून देणारी होती. स्थानिक गुन्हे शाखेकडे धाव घेण्यात आली.कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक व जिल्हा दक्षता अधिकारी मा.शंकरजी शेळके यांनी हा गुन्हा नोंदवून अहवाल सादर करावा असे लेखी पत्र सिव्हील लाईन पोलिस स्टेशनला दिले आहे.
आरोपींना मोकाट फिरण्याची मुभा देऊन निरपराधांना त्रास देणे ही पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने पोलिस खात्याची प्रतिमा मलिन होते. त्यामुळेच अनैतिक प्रवृत्तींचे थैमान सुरू असून निरपराध मात्र न्यायापासून वंचित आहेत. अशा उर्मट एपिआय महेंद्र शिंदे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळीr जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, संतोष धरमकर विभागीय संघटक,सागर लोडम, बुडन गाडेकर, रमेश समुद्र, मनोहर मोहोड, संतोष मोरे, संघटन प्रमुख-विजय देशमुख, डॉ. अशोक सिरसाट, एजाज अहेमद खान, गणेश ग. कुरई, प्रकाश जंजाळ, संजय देशमुख, अनुराग अभंग, प्रचारक ओलवे, आदींची उपस्थिती होती असे प्रसिद्धी प्रमुख योगेश शिरसाट यांनी कळविले.

