परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) रविदास जयंती निमित्त गुरु रविदास चारिटेबल ट्रस्ट परभणी व निसर्ग फाउंडेशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला पारितोषिक देऊन प्रमाणपत्र दिले परभणी जिल्ह्यातील विद्यार्थिनी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विश्वजीत वाघमारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर जवादे,विश्वनाथ तीखे हे होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश शिंदे, खंडू शिखरे, परमेश्वर जोगदंड, शिवशंकर शितळकर, माऊली रोहे, शुभम वाघमारे, कृष्णा जोगदंड, विनोद शिखरे, सुमित मुंडे, अंकुश वानखेडे, अजय साळवे,आदींनी परिश्रम घेतले तसेच,संस्थापक अध्यक्ष अंकुश जोगदंड यांनी सर्वांचे आभार मानले.

