नांदेड (समाजहित न्यूज वृत्तांत ) मध्ययुगीन कालखंडात तेराव्या शतकात संत शिरोमणी श्री गुरू रवीदास महाराज यांनी बिकट परिस्थितीमध्ये प्रस्थापितांना झुंगारून भारत देशातील तळागळातील शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसासाठी कार्य करून जाती भेदभाव दूर करणे, अंधश्रद्धेला विरोध, माणूस स्वयंप्रकाशित होण्यासाठी मोलाचे योगदान देवून कार्य करणाऱ्या या महान संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांचे कार्य व विचार वाडी-तांड्यापर्यंत पोहचणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.12 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता मानवतावादी संत, विज्ञानवादी विचारवंत, क्रांतीकारी महामानव संत शिरोमणी श्री गुरू रवीदास महाराज यांची 627 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सर्व प्रथम आगार व्यवस्थापक मा.श्री.अनिकेत बल्लाळ यांच्या हस्ते गुरू रवीदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना ते आपल्या भाषणात यावेळी म्हणाले की, गुरू रविदास महाराज यांनी आपल्या जीवन कार्यात मन चंगा तो कटोतीमे गंगा, एैसा चांहू राज मैं जहां मिले सबको अन्न, छोटो बडे सब सम बसे रविदास रहे प्रसन्न, हे ध्येय उराशी बाळगुण तमाम मानव कल्याणासाठी आयुष्य झिजले. अशा या थोर व्यक्तीमत्वाचा आपण सर्वांनीच आदर्श घेवून समाजाप्रती, देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ, आगार लेखाकार सतिश गुंजकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजीक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, यांत्रीक मंगेश कांबळे, सुरज पंडीत, बालाजी गायकवाड, कृष्णा पवार, वाहक रमेश गंधारे, वाहतुक नियंत्रक सुनिल मोरे, आनंदा कंधारे, वरिष्ठ लिपीक संतोष ढोले, नितीन मांजरमकर, सुनिता हुंबे, मनिषा कदम, वैष्णवी गंदेवार, प्रियंका खरात, संगीता वाघमारे, शिल्पा ढवळे, संजय मंगनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास रा.प.म. आगारातील कामगार-कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

