परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) येथील शारदा महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने परभणी शहरातील स्नेह व मातोश्री या दोन वृद्धाश्रमास भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या पॉकेट मनिमधील काही पैशाची बचत करून स्नेह व मातोश्री वृद्धाश्रमातील प्रत्येक वरिष्ठ नागरिकांना जीवनोपयोगी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला वृद्धाश्रमाच्या सौ. सुनीता अनिल अहिरे , अधीक्षक सौ. लीला पाठक, डॉ.हेमराज येंबल, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. गजानन मरगिळ, प्रा. विद्याधर साळवे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सचिन खडके यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थिनीची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी वृद्धाश्रमासाठी लागणारी वस्तुस्वरुपातील किंवा श्रमस्वरुपातील कोणतीही मदत करण्यास शारदा महाविद्यालय नेहमी तत्पर असेल असे मत प्रतिपादन केले. त्यानंतर प्रा. डॉ. सचिन खडके यांनी वृद्धाश्रमातील सेवाभाव, त्यांची सर्वोपयोगी केलेली सोय पाहून दोन्ही वृद्धाश्रमातील सेवेचा गौरव केला.
यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिला काकडे ताई व थोरात ताईंनी गाणे सादर केले तर विक्रांत अंबुरे व दिवे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी मुस्कान पठाण, आयेशा शेख, सानिका चव्हाण, प्रतिमा अंबुरे, उर्मिला काळे, अंजली मस्के, राणी भोसले, श्रद्धा डुकरे, सफिया फातेमा या विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे प्राचार्य डॉ. बबन पवार यांनी कौतुक केले. यावेळी दिवसभर विद्यार्थिनींनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला, दिवसभराच्या खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीक इतके रमून गेले की जसे काय घरातील कौटुंबिक वातावरण झाले होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला काहीही मदत नका आणत जाऊ नका, फक्त अधून अधून येऊन पाच मिनिटे बोलत जा, प्रेमळपण आर्त मागणी केली, त्यावेळी सर्व उपस्थितीतांच्या डोळ्यात पाणी तराळले.


