परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) आरोग्य उपकेंद्र मांडाखळी येथे जागतिक कॅन्सर दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सी एच ओ डॉक्टर राणा मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जांब प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पर्यवेक्षक श्री.मोहन पवार तर योगशिक्षिका भाग्यश्री सामाले, लिंकवर्कर स्किम प्रोग्रामचे विभागीय पर्यवेक्षक श्री.उध्दव समिंद्रे व सि एल डब्लू रेखा शिंदे हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए एन एम शेख मॅडम यांनी केले. यावेळी श्री मोहन पवार यांनी उपस्थित महिलांना आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता तसेच दैनंदिन आहार आणि बदलत्या जीवनशैलीशी निगडित आजारांविषयी माहिती दिली सकारात्मक जीवनशैली आणि योग्य सकस आहाराच्या माध्यमातून संभाव्य कॅन्सरचा धोका आपण टाळू शकतो याबद्दल सांगितले. तर भाग्यश्री सामाले यांनी योगासनाच्या माध्यमातून आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी याबाबत मार्गदर्शन केले तसेच गरोदर महिलांना योगासनाचे दैनंदिन जीवनात किती महत्व आहे याबाबत सांगून योगासनाच्या माध्यमातूनही आपण कॅन्सरशी लढा देऊ शकतो असे त्यांनी सांगितले. तर श्री.उध्दव समिंद्रे यांनी विविध कॅन्सर विषयी माहिती सांगून कॅन्सर पासून आपला बचाव कशा पद्धतीने करावा याविषयी मार्गदर्शन केले रेखा शिंदे यांनी वैयक्तिस्वच्छता व सामाजिक आरोग्य तसेच क्षयरोग सर्वेक्षण १०० दिवस या विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एम पी डब्ल्यू श्री.गजानन गायकवाड यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशावर्कर जकेरा शेख ,आशामती शिराळ,शांता हातागळे यांनी परिश्रम घेतले

