समाजहित न्यूज वृत्तांत :- परभणी मध्ये घोरबांड, तोरणार आणि मरे ह्या पोलीस अधिकारी ह्यांनी केलेली बर्बर मारहाण ह्या मुळे पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी ह्याची हत्या करण्यात आली, कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये महिला वृध्द आणि तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली असताना भाजप आमदार सुरेश धस दारू पिऊन बरळले आहेत की पोलिसांना माफ करा.त्याचे हे वक्तव्य निंदाजनक असून आरोपी पोलिसांना पाठबळ देणारे आहे.आरोपींना सार्वजनिकरीत्या पाठबळ देणे हा गुन्हा असून परभणी मधील संविधान शिल्प विटंबना, महिला सह आंबेडकरी अनुयायी ह्यांना मारहाण तसेच सोमनाथ हत्या प्रकरणात सुरेश धस ह्याला सहआरोपी करून तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे. लाँग मार्च मधे येवून जाहीरपणे आरोपीला माफ करा, हे निळी टोपी आणि दुपट्टा घालून एक लोकसेवक सांगत असेल तर आयोजक कसे ऐकून घेत होते ? नाही तर न्यायालयाचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे, हे बोलण्याची सुरेश धस ह्याची हिम्मत कशी झाली ? त्याला लाँग मार्च मधे कुणी बोलावले होते? ह्याचा तपास होणे आवश्यक आहे. एकीकडे मुख्यमंत्री सभागृहात खोटी माहिती देतो आणि त्याच्याच पक्षाचा आमदार आंबेडकरी अनुयायी ह्यांना झाले ते विसरून जा, माफ करा अशी तंबी देत आहे.सुरेश धस मानसिक रुग्ण बनला असून त्याचा उपचार सरकारने तातडीने करून त्याला पोलिसांनी सहआरोपी करून अटक करावी अशी मागणीही राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

