परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) जिल्ह्यातील मौजे. पारवा येथे कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या रासेयो विशेष वार्षिक युवती शिबिरात आमंत्रित व्याख्याते व मार्गदर्शक वाणिज्य विषयाचे तज्ञ प्रा.डाॅ.मल्हारीकांत सोंडगे यांनी आपल्या अभ्यासपूर्वक वक्तव्याच्या माध्यमातून सर्व शिबिरार्थींना, शालेय शिक्षक, विद्यार्थी,ग्रामस्थांना विचार करण्यास प्रवृत्त केले. सर्वांना प्रश्न उत्तर विचारून बोलण्यास भाग पाडले. कौशल्याच्या विविध दहा प्रकारावर भर देतांना म्हणाले की " माणसाचा जन्म हा समस्या सोडविण्याकरिता झालेला आहे, समस्या निर्माण करण्याकरिता नाही." या शिबिरात प्रा.डॉ.मल्हारीकांत सोंडगे हे मंचावर श्रोत्यांशी संवाद साधत असताना व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षीय म्हणून उप प्राचार्य डॉ. संगीता आवचार, विशेष उपस्थिती रासेयो परभणी जिल्हा समन्वयक, प्रा.अरुण पडघन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.नसीम बेगम, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी, प्रा.डाॅ. संगीता लोमटे,प्रा.पी.डी.यादव, प्रा. कौसर बेगम व आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. हर्षदा शिंदे यांनी केले तर आभार कु. साक्षी शिंदे हिने मानले.


