परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पारवा येथील दिनांक २५/जानेवारी वार शनिवार रोजी मतदार जागृती दिन निमित्ताने रासेयो शिबिरार्थींनीनी मतदार जागृती जोरदार घोषणा देत रॅली अख्या गावात फिरले. या रॅलीमध्ये ग्रामस्थांना जागृत करण्या व प्रवर्त करण्या करिता वेगवेगळ्या घोषणा दिल्या जसे की "मतदार राजा जागा हो- लोकशाहीचा धागा हो" जागरूक मतदार- हाच लोकशाहीचा आधार, चला मतदान करूया-लोकशाही रुजवूया, चाहे नर हो या नारी-मतदान है हमारी जिम्मेदारी, अठरा वर्ष केले पार-घेऊया मतदानाचा अधिकार, आदि घोषणा देत शिबिरार्थिंनीनी आणि गावकऱ्यांनी रॅलीत आपले सहभाग नोंदविले. याप्रसंगी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.नसीम बेगम तथा परभणी जिल्हा समन्वयक प्रा.अरुण पडघन, प्रा. डॉ.संगीता लोमटे, प्रा. डॉ. गणेश जाधव, प्रा.पी.डी.यादव, प्रा. कौसर बेगम, ग्राबेगम, जिल्हा परिषद शिक्षक,१८७ शालेय विद्यार्थी व शिबिरार्थींनीनी आपला सहभाग नोंदविला.

