मानवत ( समाजहीत न्यूज वृत्तांत ) सन २०१६ मधील केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात मानवतरोड ते परळी या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळून सर्वेक्षण झाले या रेल्वे मार्गाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजुरी प्रस्ताव रेल्वे बोर्ड अध्यक्ष दिल्ली यांना पाठवणे बाबत तसेच महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाचे सचिव मनोज सैनिक यांना ०१ एप्रिल २०१७ रोजी मानवत रोड ते हिंगोली या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव पाठवला. या बाबत रेल्वेमंत्री यांच्याशी संपर्क साधून रेल्वे विषयक प्रश्न समस्या सोडवण्यासाठी मानवत रोड येथे एक्सप्रेस रेल्वे चा थांबा मिळावा म्हणून सहकार्य करावे याबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रवासी प्रकोष्ट, महाराष्ट्र. परभणी जिल्हा कार्यकारणीचे सहसंयोजक
के.डी.वर्मा. भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रवासी मानवतरोड रेल्वे स्टेशन प्रमुख डॉ.विजयकुमार तोष्णीवाल, सह प्रमुख प्रकाश करपे, कोषाध्यक्ष रवि कत्रुवार, सचिव श्याम झाडगावकर. सदस्य कृष्ण बाकळे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास राज्यमंत्री ना. सौ. मेघनाताई बोर्डीकर यांना येथील जुन्या दत्त मंदिर मधील सभागृहात याबाबतचे निवेदन देण्यात आले. मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद जोशी यांच्या निवासस्थानी राज्यमंत्री सौ. मेघनाताई बोर्डीकर यांनी धावती भेट दिली असता दत्त मंदिर मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला दत्त मंदिर संस्थानच्या वतीने व वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अनुरुध्द पांडे, श्याम झाडगावकर व सर्व ब्राह्मण समाजातील सदस्य उपस्थित होते. तसेच मानवत नगरी विकासाचे भाग्यविधाते डॉ. अंकुश लाड, व साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाचे श्री. संजयजी लड्डा, प्रसाद जोशी, श्री. रेणकोजी दहे. तसेच मानवत तालुका पत्रकार संघाचे सर्व सन्माननीय सदस्य व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन २०१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभू यांनी मानवत रोड ते परळी या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन सर्वे करण्यासाठी दहा लक्ष रुपये मंजूर केले या रेल्वे मार्गाचे २०१८ साली सर्वेक्षण झाले असून त्याबाबतचा प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वे सिकंदरा बादचे मुख्य व्यवस्थापक यांनी रेल्वे बोर्ड अध्यक्ष यांच्याकडे पाठवला या रेल्वे मार्गाला महाराष्ट्र शासनाची परवानगी नसल्याने हा मार्ग रखड लेला असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळवून तसा प्रस्ताव रेल्वे बोर्ड अध्यक्ष यांच्या कडे पाठवण्यासाठी राज्यमंत्री सौ. मेघनाताई बोर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाचे परिवहन सचिव मनोज सैनिक यांनी ०१ एप्रिल २०१७ रोजी मानवत रोड ते हिंगोली या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठवला. या रेल्वे मार्गा बाबत ही पाठ पुरावा करावा तसेच मानवत रोड रेल्वे स्टेशन येथे एक्सप्रेस गाड्याचा थांबा मिळावा म्हणून नामदार मेघनाताई बोर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. मानवत शहरात मोठ्या प्रमाणावर जिनिंग आहे सोनपेठ, माजलगाव, पाथरी, मानवत या चार तालुक्यातील शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना मानवतरोड रेल्वे स्टेशन हे जवळ असल्याने तसेच मानवत रोड रेल्वे स्टेशन पासून शिर्डीचे साईबाबा यांची जन्मभूमी पाथरी हे शहर अवघे 16 कि. मी. अंतरावर असल्याने दक्षिण भारतातून येणाऱ्या सर्व साई भक्तांना मानवत रेल्वे स्टेशन उपयुक्त असल्याने मानवतरोड रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस गाड्याचा थांबा मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे या बाबतचे निवेदन ही देण्यात आले याबाबत नामदार मेघनाताई बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी व रेल्वेचे जाळे पसरावे या उद्देशाने मी एका शिष्टमंडळद्वारे रेल्वेमंत्री यांच्या शी संपर्क करून त्यांच्याशी भेट घेऊन याबाबत मी प्रश्न सोडवणार असे ना. मेघनाताई बोर्डीकर यांनी सांगितले यावेळी मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद जोशी यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने नामदार मेघनाताई बोर्डीकर यांचा सत्कार करण्यात आला तर दत्त मंदिर येथील दत्त मंदिर संस्थानच्या वतीने तसेच साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी, रेल्वे प्रवासी मानवतरोड प्रकोष्ठ रेल्वे स्टेशन प्रमुख यांच्या वतीने सौ. मेघनादीदी बोर्डीकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

