माजलगाव (वार्ताहर शेख कलीम ) दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय ह्यूमन राईट कमिशनचे जनरल सेक्रेटरी भरतलाल यांना आझाद क्रांती सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले की. जागतिक मानवी हक्क दिनाच्या दिनी परभणी येथे संविधान विरोधी विचारधारेतील एका व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ठेवलेलीसंविधानाची प्रतिकात्मक पुस्तिकाची तोडफोड केली ही तोडफोड झाल्याच्या नंतर संविधान प्रेमी असणाऱ्या भीमसैनिकांनी लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना व संविधानाची पुस्तिका तोडणाऱ्या वरती गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्याच्या मागणी साठी रस्त्यावर आंदोलन करत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी व इतर भीमसैनिकांना पोलिसांनी मारहाण केली व परभणीतील दलित वस्त्यांमध्ये कॉम्बिन ऑपरेशन राबवून महिला मुलं यांना जबर मारहाण केली यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक ही करण्यात आली होती अटक केल्याच्या नंतर ही त्यांना जबर मारहाण करण्यात आली या मारहाणीच्या दरम्यान पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला या सर्व बाबी लक्षात घेऊन हा मृत्यू नसून खूनच आहे अशा आशियाचे निवेदन आझाद क्रांती सेनेच्या वतीने राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे जनरल सेक्रेटरी भरतलाल यांना देण्यात आले यामध्ये कॉम्बिन ऑपरेशन दरम्यान महिला व भीमसैनिकावरती केलेले गुन्हे दाखल मागे घेण्यात यावेत अशी ही मागणी करण्यात आली सेना प्रमुख आझाद क्रांती सेना राजेश घोडे, महासचिव कडू दास कांबळे आझाद क्रांती सेना, भटक्या विमुक्तांचे नेते अरुणजी जाधव, शिकलकर मुनीर सातारा यांच्या निवेदनावरती सह्या आहेत.

