परभणी (प्रतिनिधी) 3 डिसेंबर आजचा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर "जागतिक दिव्यांग दिन" म्हणून दिवांगांच्या सर्व घटकांत ऐक्य निर्माण व्हावं, समतेच्या व्यापक लढयात दिव्यांगांचा विचार व्हावा, विषमतेविरुध्द दिव्यांगांनी संर्याटत व्हावे, दिव्यांगांच्या आर्थिक, मार्नासक, सामाजिक, शैक्षणिक आणि वैवाहिक अशा विविध पातळ्यांवर सखोल अभ्यास करुन समस्यांची प्रखरता सामाजापुढे आणावी, समाजाचे दिव्यांगांबद्यलचे अज्ञान, वागणूक अंधश्रध्दा, रुढी परंपरा याबाबतचे प्रबोधन करावे. खितपत पडलेल्या, दिव्यंगांमध्ये अस्मितेची जाणीव व्हावी, म्हणून हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून पाळण्यात येतो. आज परभणी जिल्हयातील खाजगी अनुदानित दिव्यांग शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी व दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातून रॅली काढण्यात आली. सदर रॅलीला श्री रघुनाथ गावडे, जिल्हाधिकारी परभणी यांनी हिरवी झेंडी दाखवून उदघाटन केले. सदर रॅलीमध्ये श्री धेर्याशल जाधव, आयुक्त, महानगर पालीका, परभणी, श्रीमती नतिशा माथुर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी, श्रीमती गीता गुट्टे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी, श्रोमतो. एस. के. भोजने, जिल्हा समाज कल्याण अधिकारी. जिल्हा परिषद, परभणी, श्री गजानन वाघमारे, उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, परभणी, श्री संजय ससाने शिक्षणाधिकारी (निरंतर) इत्यादी उपस्थित होते. प्रभात फेरीच्या माध्यामातून दिव्यांगांविषयी जनजागृतीचे विविध फलकाव्दारे संदेश देण्यात आलेले.
रॅलीचा समारोप इंदिरा गांधी स्टेडीयम येथे करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमामध्ये श्री धैर्यशिल जाधव, आयुक्त, महानगर पालीका, परभणी श्रीमती एस. के. भोजने, जिल्हा समाज कल्याण अधिकारी. जिल्हा परिषद, परभणी, श्री गजानन वाघमारे, उशिक्षणाधिकारी, (प्राथमिक) जिल्हा परिषद, परभणी. श्री संजय ससाने शिक्षणाधिकारी (निरंतर), यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. श्री पी.एम. लांडे, वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता, यांनी आभार प्रदर्शन केले.




