समाजसेवा हीच ईश्वर सेवा असे माणून नागरिकांची कामे यशवंत मकरंद यांनी आजवर केलेली आहे. सर्वसामान्यानांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सदैव झटतात. वडील व मोठयांनी दिलेले संस्क ार, विचार संपत्ती आपल्याजवळ कायमस्वरूपी राहते त्या शिदोरीवर आपण आपले जीवन समृद्धपणे जगत असतो, ताठ मानेनं सन्मानानं चालत राहतो उल्लेखनीय काम करणारे तसेच अनेक भूमिका बजावत समाजामध्ये उत्साहाने आणि आत्मविश्वासाने अनेक कार्यक्रम आजवर त्यांनी राबविले आहे. त्यांच्यातील आत्मविश्वास अभ्यासू वृत्ती प्रत्येक गोष्टीच्या
मुळाशी जाऊन सखोल अभ्यास करून मगच ती गोष्ट कशी करावी, एका गोष्टीचा विविधांगी पध्दतीने निरीक्षण कसे करावे, समाजाची आणि आपल्या कुटुंबाची सर्वांशी वागताना आपले कर्तव्य याची जाणीव करून देण्याची त्यांची चुणुक प्रत्येकाला फार भावते, मैत्रीसंबंध मधुर वाणी, शांत संयमी व्यक्तिमत्व, या गोष्टींचा उलगडा यशवंत मकरंद यांच्याशी बोलताना होतो.
सध्याच्या या स्वार्थी अन मतलबी दुनियेत माणूसकी लोप पावत चालली आहे. सर्वांचे जीवन अगदी कसे तारेवरची कसरत झाल्याप्रमाणे जो तो आपापल्या कामात व्यस्त झालाय. सर्वजण पैश्याच्या मागे लागलेत आणि संस्कार, नितीमुल्य हे सारं विसरत चालले आहेत. समाजाचं ऋण फेडावं अन समाजासाठी काहीतरी करावं अशी भावनाच आता कुणाच्या मनात येत नाही. क्वचित काही लोक सोडता सर्वकाही स्वार्थीपणे आपापल्या जगण्यात मश्गुल आहेत. पण या साऱ्यात वेगळ ठरणारं व्यक्तिमत्व, ज्याला समाजासाठी काहीतरी करायचंय, समाजात प्रबोधन घडवायचं, दुसऱ्याच्या आनंदात - आनंद मानायचा आणि आपलं - जीवन इतरांच्या जीवनासाठी समर्पित करायचे, असे व्यक्तिमत्व म्हणजे यशवंत मकरंद हे होय...
5 एक अभ्यासू वक्ता, निवेदक कवि - आणि सामाजीत क्षेत्रात निर्भीडपणे भूमिकेशी कटिबध्द असलेले नेतृत्व ही ओळख यशवंत मकरंद यांनी ■निर्वीवादपणे प्रस्थापीत केली आ- हे. गत 25 वर्षापासून सामाजीक शैक्षणिक, सांस्कृतीक आणि धार्मिक - क्षेत्रात कार्यप्रवनतेने स्वतला सिध्द ■करणारे हे बहुआयामी नेतृत्व...
■सावीत्रीबाई फुले मुलींचे ■हायस्कुल येथे इंग्रजी विषयाचे अध्यापन करतांना त्या विषयाचे एक तज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षणक्षेत्रात त्यांची ख्याती आहे. मराठवाडा शिक्षण संघाची जिल्हाध्यक्षपदाची धुरा खाद्यांवर घेतल्यानंतर परभणी जिल्हयात मराठवाडा शिक्षक संघाने - दमदार पणे मार्गक्रमन सुरु केल्याचे चित्र आह. शिक्षकांचे विविध प्रश्न - निवृत्तीवेतन, अनुकंपा भरती - जीपीएफ, मेडीकल बील, शालार्थ आयडी, वैद्यकीय पुर्तता बील, सेवा सातत्य हे प्रश्न परभणीची टिम पुं ताकदीनिशी मार्गी लावत आहे. यु. आर. घोबाळे स्मृतीशेष जी.डी. पोले राज्य कार्यकारणी सदस्य बी.टी. सांगळे, राजकुमार कदम, आर. एन. सुर्यवंशी बाळासाहेब फड, यांच्या मार्गदर्शनात यशवंत मकरंद निशांत हाके, भारत कांदे,डी. के. देवकते, नारायण कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्याची फौज आज उभी आहे.
परभणी जिल्हयातील शिक्षक गत अनेक वर्षापासून आपले वेतन राष्ट्रीयकत बँकेतून व्हावे यासा- ठी सातत्याने मागणी करीत होते. परंतू त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्या जात होते. सर्वस्तरातील शिक्षकांनी मराठवाडा शिक्षण संघाकडे निवेदन देवून संघटनेने या प्रश्नी लक्ष देण्यीच मागणी केल्यानंतर मराठवाडा शिक्ष्- ाक संघाने वेतन अधिक्षकांना निवेदन दिले. तसेच शिक्षणाधिकारी यांना तीन वेळा निवेदन दिले.5 सप्टेबर 2023 रोजी परभणी शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्या याबाबत निवेदन देवून या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली मराठवाडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव आमदार रत्नाक र गुट्टे, नगरसेवक सचिन देशमुख यांच्यापर्यंच हा विषय नेवून चळवळ गतीमान केली.
त्यानंतर उपसंचालक, संचालक आयुक्त पुणे, उपसचिव महाराष्ट्र शासन, सचिव महाराष्ट शासन यांच्याकडे पाठपुरावा करीत हे प्रकरण मंत्रालयापर्यच पोहचविले. परभणीचे जिल्हाध्यक्ष यशवंत मक रंद यांनी मुंबी येथे शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर यांची भेट घेवून या प्रश्नांचे गांभीर्य विषद केले. शेवटी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी निघाला आ. रत्नाकर गुट्टे, सचिन देशमुख, सुर्यकांतजी विश्वासराव, सुर्यकात हाके, डॉ. ज्ञानेश्वर भाले, शिवाजी वाघमारे, गणेश शिंदे, सौ. जया जाधव, या सगळ्यांच्या सहकार्यातन हा प्रश्न मार्गी लागला.
परभणीला लढवय्य अध्यक्ष आणि संघर्षसज्ज सहकारी यांच्यामुळे प्रदिर्घ प्रलंबीत असलेला हा प्रश्न सुटल्यामुळे शिक्षकांना विविध सुविधांचा लाभ मिळणा आहे. त्यात यशवंत मकरंद यांनी सातत्यापुर्ण योगदान दिले.
इयत्ता दहावी परिक्षेसाठी पर्यवेक्षम आदलाबदली करून शिक्षकावर अश्विास व्यक्त केला होता. महिला शिक्षकांची हेळसांड होणार होती या पार्श्वभूमीवर मराठवाडा शिक्षक संघटनेने आंदोलनाची भूमीका घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. हा प्रश्न तात्त्काळ सुटला. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नासाठी सातत्याने संघर्षसज्ज असलेल्या मराठवाडा शिक्षक संघ परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद यांना कोटी कोटी मंगल कामना...
निशांत हाके
जिल्हा सचिव मराठवाडा शिक्षक संघ


