परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) आज दि. 27 जानेवारी 2024 रोज शनिवार पहाटे मराठा समाजाचे नेते मा. मनोज जरांगे पाटीलके यांनी लेल्या घोषणेप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.ना. एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या पूर्ण मागण्या मान्य केल्या. मा. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रदीर्घ मराठा आंदोलनास आज रोजी यश प्राप्त झाले. "बोले तैस चाले त्याची वंदावी पाऊले", या उक्तीप्रमाणे शिव छत्रपतीच्या समोर घेतलेली शपथ मराठा समाजाच्या सर्व मागण्या मा.ना.श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांनी घेतलेली शपथपूर्ण केली. याचा जल्लोश म्हणून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांचे व मा.मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन, आभार व ऋण व्यक्त करण्यासाठी शिवसेना जनसंपर्क कार्यालय, स्टेशन रोड, परभणी पुढे फटाके वाजवून ढोल ताशात पेढे वाटून ऋण व्यक्त केले व समर्थनार्थ घोषणा दिल्या. या प्रसंगी खालील पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. अॅड. सुरेश जाधव पाटील मा. खासदार तथा शिवसेना संपर्क प्रमुख, परभणी, श्री. भास्करराव लंगोटे (शिवसेना सहसंपर्कप्रमुख) श्री केशवराव कदम (उपजिल्हा प्रमुख), श्री माणिकराव पोंढे (उपजिल्हा प्रमुख), प्रविण देशमुख (महानगर प्रमुख), शांतीस्वरुप जाधव (युवा नेते), यकीन खान, फुलाजी शिंदे, कैलास पौळ, प्रदीप कुलकर्णी, डॉ. सागर मसलेकर, पंढरी रनेर (शाखा प्रमुख), तुकाराम शिंदे (उपशाखा प्रमुख), व इतर उपस्थित होते.
मुख्य संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

