परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) परभणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते दैनिक एकजूटच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन त्यांचे तोरणा या निवासस्थानी दिनांक 27 जानेवारी रोजी करण्यात आले. दैनिक श्रमिक एकजूट वृत्तपत्राच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षापासून दिनदर्शिकेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना, हरितक्रांती, प्लास्टिक बंदी, आधी विषयी समाजात जनजागृती करण्यात येते. सन 2024 च्या दिनदर्शिका चे प्रकाशन नुकतेच आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रारंभी आमदार पाटील यांनी मराठा आंदोलनासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल व शासनाने काढलेल्या अध्यदेशाबद्दल त्यांचा अभिनंदन करत पत्रकारांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात परभणी आवृत्ती प्रमुख तथा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजकुमार हटेकर यांनी दैनिक एकजूटच्या वाटचालीबद्दल माहिती विशद केली. तसेच दिनदर्शिकेचे सातत्य गेल्या अनेक वर्षापासून कायम असल्याचे सांगितले. यावेळी राहुल पाटील यांनी दैनिक एकजूटच्या या उपक्रमाबद्दल स्तुती करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश प्रतिनिधी लक्षण मानोलीकर, सरचिटणीस बंडू बनसोडे, संघपाल अडागळे, महानगर कार्याध्यक्ष शिवशंकर सोनवणे, मोईन खान, महबूब खान, माणिक शिंदे, सुनील सुतारे, संजय घनसावंत ,शिवसेनेचे पदाधिकारी नवनीत पाचपोर ,गोपाळ चौथाईवाले, करामत खान पठाण, अमोल गायकवाड, सुभाष जोंधळे, अमोल पाटील, अब्दुल राज, शेख अस्लम, मोहम्मद जमील आदींची उपस्थिती होती.
मुख्य संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

