परभणी (जिल्हा प्रतिनिधी राहुल धबाले) आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने आज 3 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीला परभणी चे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीस सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद च्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे यांची ही प्रमुख उपस्थिती होती.याच सर्व शासकीय विभागातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.आज काढण्यात आलेली दीव्यांग प्रभात फेरी जिल्हाधिरी कार्यालय पासून काढून स्टेशन रोड मार्गे नारायण चाळ जिल्हा परिषद येथे या प्रभात फेरीचा समारोप करण्यात आला. यावेळी दिव्यांग प्रभात फेरीमध्ये परभणी जिल्ह्यातील सर्व दिव्यांगाच्या अनुदानित विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, दिव्यांग शाळा, शाळेतील कर्मचारी, दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांग संघटनाचे पदाधिकारी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

