शेतकऱ्यांच्या विविध मागण्या साठी मानवत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वतीने "रास्ता रोको " आंदोलन
SAMAJHIT NEWS (समाजहित न्यूज)December 02, 2023
0
मानवत (समाजहित न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील ताडबोरगाव आणि रामपुरी या दोन महसूल मंडळाचा दुष्काळ यादीत समावेश करा, शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय अनुदान हे बॅंकेने पिककर्जा पोटी कापु नये, शहरातील खाजगी फडीवरील गोण्या (फारी ) चा माध्यमातून शेतकऱ्यांचा मालाची करण्यात येत असलेली ०१ किलो कपात ही करू नये, आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, तसेच सिंचन विहीरींचे कुशलचे बिल हे लवकरात लवकर लाभार्थी शेतक ऱ्यांना देण्यात यावे अशा विविध माग ण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वतीने ०२ डिसेंबर रोजी मानवत येथील माहारणा प्रताप चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ ढगे यांच्या नेतृत्वाखाली " रास्ता रोको " आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी घोषणा बाजी करत रस्त्यावर ठिय्या मांडला होता तर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती त्यानंतर उपस्थित आंदोलन कर्त्यानी विविध मागण्याचे निवेदन प्रसासनास सादर केले या वेळी आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष तालुकाध्यक्ष नामदेव काळे, युवा तालुकाध्यक्ष दत्ता परांडे, सूरज काकडे, गोविंद घांडगे, कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक विशाल यादव, कृष्णा काळे, संतोष आंबेगाव कर, नारायण आवचार, आसाराम काळे, बाळासाहेब काळे, गोपाळ काळे, महादेव काळे, महादेव शिंदे, दत्ता काळे, बाबा शिंदे, केशव काळे, रामेश्वर काळे, उद्धव काळे यांच्या सह यावेळी तालुक्यातील शेतकरी आंदोलनात मोठया संख्येने सहभागी झाले होते. आंदोलना दरम्यान कोण ताही अनुचित प्रकार घडू नये या साठी मानवत पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक दिपक, दंतुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली, किशन पतंगे, नारायण घोरपडे, विलास मोरे, यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.