ही बाब अत्यंत निंदनीय असून पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर व भारतीय संविधानातील कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य वर घना घात करून गदा घालण्याचा प्रयत्न आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाचा आरसा म्हणून आपला जीव धोक्यात घालून रात्री बे रात्री बातम्या गोळा करून, तसेच समाजात होत असलेल्या अनिष्ट प्रथा, अवैध धंदे, जनजागृती, जनसामान्यावर होणारे अन्याय अत्याचार यांच्या विरोधात आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचे व महत्त्वाची माहिती देण्याचे काम करत असते. त्यांच्याच बातम्याना खोटी बातमी सांगून त्यांच्या विरोधात मानहानीच्या नोटीसा दिल्या जात आहे. या मुळे पत्रकारांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. व अशा धनदांडग्या, बेजबाबदार, डॉक्टर व्यंकटेश डुब्बेवार यांच्या पासून पत्रकारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
संबंधित बेजबाबदार पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ.व्यंकटेश डुब्बेवार व डॉ. सागर चेऊलवार यांचे डॉक्टरकीचा परवाना रद्द करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख, महाराष्ट्र संघटक तथा संपर्कप्रमुख भगीरथ बद्दर परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन, निदर्शने करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी मा.जिल्हाधिकारी परभणी यांना लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ जिल्हा परभणी च्या वतीने देण्यात आला आहे. हे निवेदन प्रतिलिपी म्हणून मा. मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई- 32, मा. आरोग्य मंत्री, आरोग्य मंत्रालय मुंबई -32., मा. पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय जि. परभणी., मा. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, जि.परभणी, मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी, परभणी शहर महानगरपालिका जि. परभणी, मा. संजय एम.देशमुख संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ, अकोला महाराष्ट्र राज्य आदींना पाठवले आहे. निवेदनावर मा.भगीरथ बद्दर, महाराष्ट्र संघटक तथा संपर्कप्रमुख( संपादक सा.प. पोलखोल).,मा.दिलीप बनकर, परभणी जिल्हा अध्यक्ष ( संपादक परभणी न्यूज ), मा. शिवशंकर सोनवणे, परभणी - नांदेड संपर्कप्रमुख ( जिल्हा प्रतिनिधी दैनिक लोकमंथन ), मा. प्रमोद अंभोरे, परभणी जिल्हा सचिव ( संपादक समाजहित न्यूज ), मा. राहुल धबाले, परभणी जिल्हा अध्यक्ष डिजिटल मीडिया, मा.रमेश घनघाव ( परभणी प्रतिनिधी समाजहित न्यूज ), सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज, संजय घनसावंत (प्रेस फोटोग्राफर), बाळासाहेब घिके (महाराष्ट्र माझा ), रियाज कुरेशी, हरिभाऊ सुतारे, बालाजी कांबळे, सय्यद जमील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

