परभणी ( प्रतिनिधी रमेश घनघाव) परभणी शहरातील पांडुरंग सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल, विष्णुनगर वसमत रोड परभणी या रुग्णालयात दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी कुमारी ऐश्वर्या सखाराम खाडे ( वय वर्षे 17 ) राहणार हट्टा तालुका वसमत जिल्हा हिंगोली हिला डॉक्टरांच्या सांगण्यावरून ऍडमिट करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिची प्रकृती जास्तच बिघडल्याने सदरील हॉस्पिटल ने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ॲम्बुलन्स ची व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही व तसे रुग्णाला व रुग्णाच्या नातेवाईक यांना सांगितले नाही व दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी सदरील रुग्णास डिस्चार्ज केले असल्याचा आरोप यशवंत सोनवणे यांनी केला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाला पुढील उपचार करण्यासाठी वेळ न मिळाल्याने सदरील रुग्णाचा दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी नांदेड कडे जात असताना मृत्यू झाला असल्याचा आरोप उपोषण करते यशवंत भीमराव सोनवणे यांनी केला आहे. या संदर्भात यशवंत सोनवणे यांनी दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी पोलीस निरीक्षक नवा मोंढा पोलीस ठाणे परभणी यांना डॉक्टर व्यंकटेश डुब्बेवार व सागर चेऊलवार या दोघांवर निष्काळजीपणे औषधोपचार करून मृत्यूस कारणीभूत ठरल्या कारणाने कायदेशीर कारवाई करून एफ.आय.आर. ची प्रत मिळण्याबाबतचा तक्रार अर्ज केला होता व संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे तक्रार अर्जात नमूद केले होते. परंतु संबंधित रुग्णालय व रुग्णालयातील डॉक्टरांवर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने यशवंत सोनवणे यांनी दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी माननीय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना संबंधित रुग्णालय व डॉक्टरांवर योग्य ती कारवाई न झाल्यास दिनांक 11 डिसेंबर 2023 पासून उपोषणास बसण्या संदर्भात निवेदनाद्वारे कळविले होते. परंतु नंतरही संबंधितांवर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने यशवंत भीमराव सोनवणे व त्यांचे इतर नातेवाईक हे दिनांक 11 डिसेंबर 2023 पासून 1) डॉ.व्यंकटेश डुब्बेवार व सागर चेऊलवार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी. 2) मयत ऐश्वर्या खाडे हिला न्याय देण्यात यावा. 3) सदरील हॉस्पिटलचे शासन मान्यता रद्द करण्यात यावी या प्रमुख मागण्यासह पांडुरंग सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल विष्णुनगर वसमत रोड परभणी येथे हॉस्पिटलच्या समोर उपोषणास बसले आहेत. उपोषणकर्ते यांनी समाजहित न्यूज बोलताना म्हणाले की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील. तसेच या उपोषणास वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हा संघटक जेष्ठ कार्यकर्ते युसुफ कलीम यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. सदरील कुटुंबीयास जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी राहील असेही यावेळी युसूफ कलीम यांनी समाजहित न्यूज बोलताना सांगितले आहे.
मुख्य संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 85309358211✍️✍️

