परभणी (लोहगाव वार्ताहर राहुल मगरे ) तालुक्यातील लोहगाव येथे दिनांक 6 नोव्हेंबर रोजी विविध लोक उपयोगी कामाचे उद्घाटन माजी सभापती समशेर वरपूडकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सखारामजी बालासाहेब लोहगावकर, चेअरमन जावेद भाई, माजी सरपंच अर्जुनराव बालासाहेब देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनोद भैया लोहगावकर, माजी उपसरपंच अजगरुद्दीन इनामदार, शौकतखा पठाण, दिनू पटेल, सुभानखा पठाण, सखारामजी धोत्रे, शिद्धिक पटेल, ज्ञानोबा पवळे, अशोक दिवसे, सचिन मुळे, संजित दिवसे, आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

