परभणी(समाजहित न्यूज वृत्तांत) येथील शारदा महाविद्यालयाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या सयुंकत विद्यमाने घेण्यात आलेल्या अंतर महाविद्यालयीन ज्ञान तीर्थ 2023 या युवक महोत्सवात दोन पारितोषिके प्राप्त झाली आहेत, यात एका रौप्य व एका कास्य पदकाचा समावेश आहे.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि प्रशिक्षक प्राध्यापकांचे अभिनंदन केले. सुगम गायन, शास्त्रीय गायन, समुह गायन, विडंबन अभिनय, वकृत्व, कथाकथन, चित्रकला, मेहंदी, इत्यादी कला प्रकारात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी स्थळ छायाचित्रण या कला प्रकारात रौप्य पारितोषिक व कोलाज या प्रकारात कास्य पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल अनुक्रमे गौतम घोडके व कृष्णा वाकडे यांच्यासह सहभागी विद्यार्थी विकास दळवे, श्रद्धा अडणे, श्रावणी लंगोटे, आरती गुरव, शारदा जावडे, चेतन नीलोलू, यादव लोखंडे, समर्थ पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ.ज्ञानोबा मुंढे, संघ व्यवस्थापक डॉ. एन. व्ही. सिंगापुरे, डॉ. एस. एन. कुलकर्णी यांच्यासह प्रशिक्षक किरण डाके, हरिभाऊ कदम, कान्हा सिंगारे, संकेत गाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतीक समितीचे सदस्य डॉ. काजी कलिमोड्डीन, डॉ . अंजली शिंदे, प्रा. आयेशा ताजीन, प्रा. विनायक गुजर, डॉ.सचिन खडके यांचाही महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संस्थापक संपादक :प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


