> गायरान धारकांची मानवत तहसीलदार रणजित सिंग कोळेकर यांच्या कडे मागणी <
मानवत / (साजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील मौ. भोसा येथील गायरान जमीन गट क्रं.२५ मधे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून हा सौर प्रकल्प तात्काळ स्थगित करावा अशी मागणी येथील गायरान धारकांनी मानवत तहसीलदार रणजित सिंग कोळेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. येथील गायरान धारक सण १९७० पासून जमिनीची वहिती करत असून कुटूंबा चा उदर निर्वाह करत आहेत. परंतु काही महिन्या पूर्वी अशी माहिती प्राप्त झाली कि, येथील गायरान जामीन गट क्रं २५ मध्ये सौर ऊर्जा प्रकल्प तयार केला जानार आहे परंतु प्रकल्प उभार ल्यास उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. सदरील हा प्रकल्प तात्काळ स्थगित करावा अन्यथा तहसील कार्यालया पुढे अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा ही यावेळी निवेदनाद्वारे दिला असून निवेदनावर धोंडीराम झोडपे, वामन झोडपे, कोंडीराम झोडपे, उषा वाव्हळे, पद्मावती गायकवाड, डी.एम.झोडपे नारायण झोडपे, कोंडीबा झोडपे, परमेश्वर प्राधान, भगवान सावळे, प्रकाश प्रधान, कोंडीबा झोडपे, वेणूताई झोडपे, साखरूबाई प्रधान, शांताबाई झोडपे, सुभाष झोडपे, विमल झोडपे, सूर्यकांत ढोले, लक्ष्मण झोडपे, सुंदर झोडपे, भगवान झोडपे, निवृत्ती झोडपे, बाबुराव झोडपे, रामचंद्र झोडपे, लक्ष्मण झोडपे यांच्या सह गायरान धारकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


