परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) गोर - गरिबांच्या, अन्याय ग्रस्तांच्या, फसवणूक ग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र सतत संघर्ष करून ऑन द स्पॉट न्याय मिळवून देणारी तसेच बेरोजगारांना स्वयं रोजगार निर्माण करण्यासाठी अर्थ साहाय्य करणारी महाराष्ट्रातील एकमेव सामाजिक संघटना दयावान सरकार महाराष्ट्र राज्य चे डोंबिवली- कल्याण जिल्हाध्यक्ष डॉ.संदीपभाई पाईकराव हे काही कामानिमित्त परभणी येथे आले असता त्यांना त्यांचा दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा टीम च्या वतीने तसेच रुग्णहक्क संरक्षण समिती, समाजहित अभियान प्रतिष्ठान, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या विविध सामाजिक संघटनेच्या वतीने डॉ.संदीपभाई पाईकराव यांचा परभणी रेल्वे स्टेशन व तसेच दयावान सरकार महाराष्ट्र राज्य जिल्हा परभणी कार्यालय डॉ.आंबेडकर नगर आय.टी. आय.कॉर्नर जिंतूर रोड परभणी येथे भव्य असा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य मराठवाडा अध्यक्ष संजयभाई गायकवाड, परभणी जिल्हाध्यक्ष रघुवीरसिंग भाई टाक, परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रमोदभाई अंभोरे, समाजहित अभियान प्रतिष्ठान सचिव जनसेवक रमेश घनघाव, रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष जेष्ठ पत्रकार दिलीप बनकर, जिल्हाउपाध्यक्ष शेख सरफराज, खय्युम बेग, सय्यद खदिर आदींची उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना डॉ.संदीपभाई पाईकराव यांनी सत्कार करून मान सन्मान दिल्या बद्दल दयावान सरकार महाराष्ट्र राज्य जिल्हा परभणी चे व समाजहित अभियान प्रतिष्ठान, रुग्णहक्क संरक्षण समितीचे आभार मानले आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821



