डोंबिवली (मुंबई कार्य. संपादक ऍड.सुभाष अंभोरे) गोर - गरिबांच्या, अन्याय ग्रस्तांच्या, फसवणूक ग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र सतत संघर्ष करून ऑन द स्पॉट न्याय मिळवून देणारी तसेच बेरोजगारांना स्वयं रोजगार निर्माण करण्यासाठी अर्थ साहाय्य करणारी महाराष्ट्रातील एकमेव सामाजिक संघटना दयावान सरकार महाराष्ट्र राज्य चे आधारस्थंभ मा.आश्विनभाई नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दयावान सरकार महाराष्ट्र राज्य व नहार हॉस्पिटल डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 04:00 वाजेपर्यंत दावडी गाव डोंबिवली(पु)ता.कल्याण जि.ठाणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात वैद्यकीय तपासणी त्यात रक्तदाब, पल्स, ई.सी.जी., शरीरातील ऑक्सिजन पातळी, रक्त तपासणी, सीबीसी, मधुमेह, तसेच सर्दी, ताप, खोकला, पोटदुखी, उलटी व जुलाब या साठी मोफत औषधउपचार तसेच वैद्यकीय सल्ला, नेत्र तपासणी- नेत्र चिकित्सा, जेष्ठ नागरिकांनासाठी मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन दयावान सरकार महाराष्ट्र राज्य चे मुख्य मार्गदर्शक मा.अरविंदभाई सपकाळे, सर्वेसर्वा मा.संदीपभाई निकुंभ तसेच दयावान सरकार महाराष्ट्र च्या वतीने करण्यात आले आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

