परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर ) परभणी महानगरपालिकेचे माजी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष एस. एम. अली पाशा यांचे शुक्रवारी दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी सकाळी निधन झाले, मृत्यूसमयी ते 65 वर्षांचे होते. कादराबाद प्लॉट भागातील पाशा हे नगरपालिका व महानगरपालिकेत पाच वेळा सदस्य म्हणून निवडून आले होते. राष्ट्रीय जनता दल, शहर विकास आघाडी, कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून पाश्या यांनी नगरपालिकेवर प्रतिनिधित्व केले. ते पालिकेचे काँग्रेसचे नगराध्यक्ष म्हणून सुद्धा कार्यरत होते. राजकीय क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते, उत्तम संघटक व शेरोशायरीचा मोठा छंद असणारे पाशा यांचा मोठा मित्रपरिवार होता.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

