परभणी (प्रतिनिधी शेख अझहर) अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक समाजीक राजकीय पुनर्वसन करून सर्वागीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन शिंदे शिवसेना अल्पसंख्याक समाज चे प्रदेश अध्यक्ष सइद खान यांनी परभणी शहरातील पारवा रोड येथील बाबा फंक्शन हाॅल येथे लोकश्रेय मित्र मंडळा ने आयोजित केलेल्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी हाजी खलील देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हाजी हरुण भाई, हाजी मझर, बाबा नाईक, शिवसेना नेते जलील पटेल, मागासवर्गीय महिला अघाडी च्या अनिता ताई सरोदे, शेख शफी भाई, जितुंर चे माजी नगरसेवक टिका खान , पाथरी चे माजी नगरसेवक अन्वर भाई, माजी जि प सदस्य राठोड, नांदेड चे अन्सार खा पठाण, माजी सरपंच दिगंबर भिसे पाटील , आसेफ खान, पुणे येथील शेख शननो दिदी, लोकश्रेय महिला अघाडी च्या जिल्हाध्यक्ष सौ सोनाली बुडगे, लोकश्रेय चे जिल्हाध्यक्ष शेख नईम मुकदर खान, सलीम इनामदार यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना सइद खान यांनी परभणी शहरात माणस राहात नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करून अल्पसंख्याक च्या नावावर नेते मडंळी ने आप आपले स्वतः चे घर मोठे केले असून जाम नाका ते दर्गा जेल काॅरनर ते अपना काॅरनर गुलशना बाग ते देशमुख हॉटेल या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी भकाल अवस्था नेत्यांनी करुन ठेवली असल्याने निवडणूकीत मते मागायला आले तर त्यांना दगडाने हाना असे सागुन अल्पसंख्याक समाजा च्या वसाहती मध्ये सर्व अपूर्ण नागरी सुविधेचा अभाव दिसत असल्याने राज्याचे धडाकेबाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली येवुन मनापा वर सत्ता स्थापन करून शहराचा देखील सर्वागीण विकास करून दाखवु व सलीम इनामदार यांच्या कार्याचे गुणगान घावुन कौतुक करुन विकासा साठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले . या वेळी जलील पटेल , अनिता ताई सरोदे , मुकदर खान यांचे समयोचित भाषणे झाली . या कार्यक्रमात अरसला खान, सय्यद ईरफान भाई , सलाम भाई, गुतेदार पांडुरंग रणखाब, माजी नगरसेवक बबन राव नेटके, प्रधान सर, शेख सरवर, ईरफान खान, महेबुब भाई, प्रशासकीय अधीकारी मुन्ना चाऊस, जम्मू शेख खीजर, सकीना बाजी, मुननी बाजी, शारदा ताई यांच्या सह अनेक महीला व पुरुषांची खचाखच हाॅल भरून गर्दी होती. या प्रसंगी हास्य सम्राट सिद्धार्थ खिलारे यांनी महोमद के शहर मे कवाली सादर केली व शायर गर्दीश यांनी शाहीरी केली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकश्रेय मित्र मंडळा चे संस्थापक अध्यक्ष तथा लोकश्रेय न्यूज चे संपादक सलीम इनामदार यांनी केले तर सूत्रसंचलन डाॅ. सुनिल जाधव यांनी केले तर अभार प्रदर्शन शेख सद्दाम यांनी मानले.
संस्थापक संपादक :प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

