> मानवत तालुक्यातील ईटाळी येथील घटना ; शेतकऱ्याचे तीन लाखाचे नुकसान <
मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) तालूक्यात अनेक दशका पासून शेतकर्यांच्या शेतात जाणार्या तारा लोबकळत असून या कडे मात्र प्रशासनाचे लक्ष नाही, तर गूत्तेदारांना पोटाशी धरून गलेलठ्ठ होण्याकडे प्रशासनाचे लक्ष असल्यामूळे तालूक्यातील शेतकर्यावर आस्माणी संकटा बरोबर सूलतांनी संकट कोसळले त्यामूळे शेतकर्याचे मोठे अर्थीक नूकसान झाले आहे.
विजेची तार तुटून पडल्याने दोन एकर ऊस व ठिबक सिंचन साहित्य जळून खाक झाल्याची घटना मानवत तालुक्यातील मौ. ईटाळी शिवरात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मानवत तालुक्यातील मौ. ईटाळी येथे गट नं ८३ मध्ये गजानन किशन चौधरी यांची शेती असून यात त्यांनी सात ते आठ एकर मध्ये ऊस क्षेत्राची लागवड केली आहे. परंतु १० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता अचानक विजेचा सॉर्ट सर्किट होत विद्युत तार तुटून पडली व अचानक पेट घेतला असता शेतातील दोन एकर ऊस आणि ठिबक सिंचन साहित्य जळून खाक झाले आहे यात शेतकऱ्याचे तीन लाख रुपयाचे मोठे नुकसान झाले असून सदरील घटनेची माहिती शेतकरी गजानन किसन चौधरी यांनी तात्काळ मानवत पोलीस व महावितरण विज कंपनीस दिली असता महावितरण विज कंपनी व महसूल विभागाचा अधिकारी व कर्मचारी यांनी ११ ऑक्टोबर रोजी घटनास्थळी धाव घेत पाहणी केले व घटनेचा पंचनामा पंचा सक्षम करण्यात आला यावेळी मंडळाधिकारी जगन बिडवे, तलाठी श्री. विठ्ठल नागरगोजे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुभाष गायकवाड, जनमित्र आचार्य, मुंजाभाऊ चौधरी, बाबासाहेब चौधरी, राधाकिसन खटे, भास्कर साळवे, संघपाल ठेंगे यांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करण्यात आला. शेतकरी गजानन चौधरी यांचा ऊस हा ऐन हंगामात जळाला असून त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे सदरीलची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्याकडून केली जात आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821



