डोंबिवली (कार्य.संपादक ऍड.सुभाष अंभोरे) गोर, गरिब, गरजू लोकांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र सतत संघर्ष करून ऑन द स्पॉट न्याय मिळवून देणारी तसेच बेरोजगारांना स्वयं रोजगार निर्माण करण्यासाठी अर्थ साहाय्य करणारी महाराष्ट्रातील एकमेव सामाजिक संघटना दयावान सरकार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीपभाई निकुंभ यांच्या महाराष्ट्रभर निःस्वार्थ चालत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी डोंबिवली - कल्याण पक्षाच्या वतीने आज दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यालय डोंबिवली मुंबई येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी डोंबिवली - कल्याण जिल्हा अध्यक्ष अनुरथ धबाले, उद्योजक भीमराव खंदारे, ऍड. कसबे साहेब, उद्योजक अमोल मकरंद, युवा नेते अमोल अंभोरे, भीमसैनिक अंबादास शेळके, रिपाई एकतावादी कार्यकर्ते बंडू बॉस धबाले आदी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
संस्थापक संपादक :प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


