परभणी(प्रतिनिधी प्रदीप लांडगे) दिनांक 25 सप्टेंबर 2023, रोजी संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन (NSS DAY ) साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गौतम वाघमारे तर प्रमुख पाहुणे प्रा डॉ रमाकांत मुंढे हे उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा डॉ रमाकांत मुंढे यांनी तरुणांच्या जीवनात NSS च्या माध्यमातून श्रमाचे महत्व व देशसेवेचे महत्व विशद केले.
"युगाला वष करून कव्हेत घेण्याची क्षमता ठेवतो तो युवक" अशी युवकाची समर्पक व्याख्या प्रा डॉ मुंढे यांनी मांडली. अध्यक्षीय समारोपात बोलत असताना प्राचार्य डॉ गौतम वाघमारे यांनी NSS च्या इतिहासाचे विस्तृत अनवलोकन केले व युवकांनी आपत्कालीन परिस्तिथीत देशाप्रति समर्पित राहावे असे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NSS विभागप्रमुख प्रा डॉ मा. मा. कदम व प्रास्ताविक NSS विभाग प्रमुख प्रा चंद्रकांत मगर यांनी केले. आभारप्रदर्शन रोहित धबाले या विध्यार्थ्यांने केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


