तसेच वसतिगृह बाजूस असलेली तुंबलेल्या नालीचे घाण पाणी वसतिगृहात सोडण्यात येईल अशी भाषा करण्याऱ्या व मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहास वारंवार संपत्ती जप्ती ची नोटीस देऊन भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या मनपा प्रभाग समिती ब च्या अधिकाऱ्यांवर मा.सर्वोच्च न्यायालय, मा.उच्च न्यायालय यांच्या आदेशांचा अवमान केल्या बाबत संबधीता विरोधात ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार पोलिसात व मा.न्यायालयात तक्रार दाखल करण्या बाबत चे तक्रार निवेदन दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी आयुक्त तथा प्रशासक परभणी महानगरपालिका यांना संस्थेचे अध्यक्ष तथा आर.पी.आय. आठवले डोंबिवली शहर उपाध्यक्ष तथा दयावान सरकार डोंबिवली कार्याध्यक्ष तथा कार्यकारी संपादक समाजहित न्यूज ऍड.सुभाष अशोकराव अंभोरे दुधगांवकर यांनी दिले आहे.
त्याच बरोबर आज दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी मा. जिल्हाधिकारी परभणी, मनपा उपायुक्त, मनपा सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती ब, कर निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक प्रभाग समिती ब आदींना देण्यात आले आहे. ऍड. सुभाष अंभोरे दुधगांवकर हे समाजहित न्यूजशी बोलताना म्हणाले कि, मनपा आयुक्त तथा प्रशासक यांनी मागासवर्गीय वसतिगृहास न्याय देण्यास व संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात कसूर केल्यास संबधीत अधिकाऱ्यांवर लवकरच पोलिसात व मा.न्यायालयात ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार तक्रार दाखल करण्यात येईल असे बोलले. या प्रकरणात महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडभोर या संबंधित मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात? या कडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821





