धर्माबाद (प्रतिनिधी - नारायण सोनटक्के) महाराष्ट्र व तेलंगाना या दोन राज्यांतील प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रिपब्लिकन सेनेचे धर्माबाद तालुका अध्यक्ष साहेबराव दुगाने यांनी राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती, याची दखल घेत विभाग नियंत्रक विभाग नांदेड यांनी नुकतेच एक पत्र जारी करून बससेवा सुरू करण्याचे बिलोली आगार व्यवस्थापक यांना आदेशीत केले आहे. या पत्रात असे नमुद करण्यात आले आहे, की धर्माबाद - बन्नाळी - तानुर - बेलतरोडा या आंतरराज्य मार्गावर नवीन नियत देण्यात येत आहेत देण्यात आलेल्या नियतप्रमाणे त्वरीत वाहतूक सुरु करण्यात यावी. सदरचे नियत व नियतातील फेऱ्या दैनंदिन दिलेल्या वेळेप्रमाणे चालविण्यात यावे. फेऱ्या रद्द होणार नाहीत तसेच फेऱ्यांचे भारमान कमी येणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात यावी. केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल उलट टपाली अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा. असे आदेशित करण्यात आले आहे.
मुख्य मार्गापासून वीस ते पंचवीस किलोमीटर असलेले भैसा गाव मुदल धर्माबाद गाडी बस सेवा उपलब्ध करण्यासाठी धर्माबाद येथील अनेक गावातून रहिवासी कामाला जातात.आणि आंध्रा येथील बासर सरस्वती देवस्थान प्रसिद्ध असलेले. लोक धर्माबाद पर्यंत जाऊन निजामबादला आंध्रप्रदेशात कामाला जाणाऱ्या चांगल्या आणि मोठे इस्पितीकाळ तालुक्याला असल्यामुळे आजारी रोगांना वैयक्तिक वाहनाशिवाय पर्याय नाही.
या सर्व गोष्टीमुळे धर्माबाद गावकऱ्यांनी खाजगी सेवा देणारे तर खूपच प्रवास शुल्क आकारत असल्याकारणाने त्यांचा रोज उपयोग करणे सुद्धा प्रवाशांना अवश्य आहे. तरीही महोदय आपणास विनंती आहे की धर्माबाद ते भैसा गाडी दोन वेळा उपलब्ध करून दिली जावी जेणेकरून रहिवाशांचे जीवन उद्धारेल मुख्य मार्ग पासून ते धर्माबाद पासून भैया पर्यंत रोड पक्की आहे. त्यामुळे वाहनांना अगदी सोयीस्कर आहे. बस सेवा उपलब्ध झाल्याने आजु बाजुच्या गावांना सुद्धा लाभ होईल. तसेच महामंडळाला नियमित भाडे मिळेल. तरीही लवकरात लवकर आपली प्रतिक्रिया कळवावी आणि बस सेवा सुरू करावे. अशा पध्दतीची मागणी करण्यात आली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत बस सेवा सुरू करण्यात आल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.
