परभणी (समाजहीत न्यूज वृत्तांत )दिनांक १३ सप्टेंबर – परभणी जिल्हा कॉंग्रेस कमिटी मिडिया विभाग ने राज्य सरकार च्या कंत्राटी पद्धत नोकर भरती निर्णयाचा जाहिर निषेध केला व सरकारने ताबडतोब हा निर्णय मागे घ्यावा असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे साहेब जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले . देशात तसेच राज्यातही बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परिक्षांसाठी तयारी करत आहेत.राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. तलाठी पदाच्या भरतीसाठी १४ लाख तरूणांनी अर्ज भरले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना राज्य सरकार जर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करत असेल तर हा राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांची क्रूर थट्टा आहे व उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची ही घोर फसवणूक आहे. खाजगी कंपनीच्या माध्यमातून नोकर भरती करण्याचा प्रकार हा केवळ कंत्राटदारांच्या फायद्याचा आहे. १५ -२० हजार रुपये देऊन तरुणांची बोळवण करणार व कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा हा प्रकार आहे. भांडवलशाही इंग्रजांच्या मनोवृत्तीचे हे सरकार असून देशातील सर्व संस्था स्वतःच्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हे टाकलेलं पाऊल आहे.
या निर्णयामुळे आता पदभरतीसाठी परीक्षा न होता खाजगी दलालांमार्फत पदे भरली जातील आणि सगळीकडे हुशार उमेदवार न भरले जाता सर्वत्र वशिलेबाजीने लागलेले उमेदवार दिसतील.या निर्णयाचा काँग्रेस पक्षाने जाहीर निषेध केला तसेच सरकारने ताबडतोब हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल असे निवेदन देण्यात आले . निदेनावर सुहास पंडित सरचिटणीस (मडीया विभाग) महारष्ट्र प्रदेश कॉं. कमिटी, श्रीधर देशमुख किसान विभाग जिल्हाध्यक्ष, सुरेश काळे , राजेश रेंगे , सिद्धार्थ लोणकर , रोहोत घोडके रोहण पुंडगे,जगन्नाथ रानेर, प्रल्हाद अवचार ,रामदास वाघ , आदि पदाशिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

