मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत येथील सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालयात ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्सहात साजरा करण्यात आला यावेळी एक वर्ग एक जयंती किंवा पुण्यतिथी या उपक्रमांतर्गत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुस्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. त्या नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विश्वभूषण इंगोले, पर्यवेक्षक विलास शिंदे, सुरेश काळे, श्रीमती. दिपा भावसार, श्रीमती. मेघा भुसारे, श्रीमती. वर्षा दडके, श्रीमती. निता गळाकाटू, श्रीमती. सारिका पवार, चिलवंत, श्रीमती. उषा बोचरे, श्री. दत्ता शिंदे, बालाजी होंडे, श्रीपाद दडके, माकुडे यांचा विदयार्थ्यांनी पुस्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या भितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षिकेच्या व शिक्षकांच्या वेशभूषेत शिक्षकांबद्दल मत व्यक्त केले तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली सामान्य ज्ञान स्पर्धेतुन तीन विदयार्थ्यांची निवड करण्यात आली यावेळी कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
मानवत येथील सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालयात शिक्षक दिन साजरा
September 06, 2023
0

Tags