पाऊस पडावा या साठी मानवत येथे मुस्लिम समाज बांधवाचे नमाज पठण
September 06, 2023
0
मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) पाऊस पडावा या साठी मानवत येथे मुस्लिम समाज बांधवाचा वतीने तीन दिवस नमाज पठण करण्यात येणार आहे. अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्याची पिके धोक्यात आली असून सुकत आहेत याच अनुषंगाने मानवत येथील मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने आजपासून शहरातील उक्कलगाव रोड येथील ईदगाह मैदनावर धर्मगुरू यांच्या मार्गदर्श नाखाली नमाज अदा करण्यात आली धर्मगुरू मौलाना सुलतान मिल्ली यांनी नमाज अदा केली व पाऊस पाणी चांगला पडावे आणि शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न व्हावे व सर्व लोक सुखी राहावे या साठी प्रार्थना व (दुवा) केली. गेल्या काही महिन्यापासून पावसाचा खंड पडला आहे यामुळे शहरा सह तालुक्यात सर्वत्र उन्हाचा चटका वाढत आहे सातत्याने पाऊस नसल्यामुळे शेतातील उभ्या पिकांनी माना टाकल्या आहेत सोयाबीन पिक पिवळे पडून करपून जात आहे यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे पाऊस पडवा आणि सुख समृद्धी नांदावी यासाठी मानवत शहरात दिनांक ०६ सप्टेंबर ते ०८ सप्टेंबर तीन दिवस इदगाह मैदाना वर नमाज पठण करण्यात येत आहे. शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी इदगाह मैदानावर गुरुवारी रोजी साडेनऊ वाजता तसेच शुक्रवारी तीन वाजता नमाज पठण करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन धर्मगुरू यांनी मुस्लिम बांधवाना केले आहे.
Tags
