डोंबिवली (कार्यकारी संपादक ऍड सुभाष अंभोरे ) आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी शरद राजाराम मोरे रा. तुलसी पार्क पार्वती बिल्डिंग, कैलास नगर जुना गाव डोंबिवली हे कैलास नगर ते रेल्वे स्टेशन असा रिक्षात प्रवास करत असताना रिक्षात नकळत सोन्याचे दागिने असलेली बॅग विसरून गेले होते. त्या संदर्भात मोरे यांनी विष्णू नगर पोलीस स्टेशन, डोंबिवली पश्चिम ला जाऊन माहिती दिली. तेंव्हा
पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. देवोरे यांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. नितीन सावंत व पोलीस कॉन्स्टेबल श्री. पाठणकर यांच्या मदतीने तपास करून सीसीटीव्ही फुटेच्या माध्यमातून ऑटो चालकाचा शोध घेऊन सदरील सोन्याच्या दागिन्यांची बॅग फिर्यादीस मिळवून दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक श्री. भवर, पोलीस उपनिरीक्षक श्री. देवोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. नितिन सावंत, पोलीस कॉन्स्टेबल श्री. पाठणकर आदींनी मोठ्या शिताफीने बॅगेचा शोध लावला आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कार्याबद्दल फिर्यादी मोरे यांनी समाधान व्यक्त केले असुन सर्वच स्तरातून पोलीसांचे कौतुक केले जात आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

