परभणी जिल्हा वाहतूक पोलिस शाखेच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता
जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पी.एस.आय. रवींद्र दीपक, पी.एस.आय. मकसूद पठाण यांच्या उपस्थित चोख बंदोबस्त
परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय सचिव खा. पंकजाताई मुंडे हे आज दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी परभणी दौऱ्यावर असताना सुरक्षा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी परभणी जिल्हा वाहतूक पोलिस शाखेच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे वाहतुकीस अडथळा व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला नाही.
यावेळी बंदोबस्तात परभणी जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पी.एस.आय. रवींद्र दीपक, पी.एस.आय. मकसूद पठाण, पोलिस अमलदर योगेश सानप, शेख मुस्ताक, अनिल गायकवाड, सैय्यद शफीक, आदींनी विशेष नियंत्रण ठेवले होते.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

