परभणी (प्रतिनिधी भारत कनकुटे) येथील समाजसेवक रवी साबळे यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे समाजसेवक तथा रुग्णसेवक रवि साबळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. परभणी येथील माता रमाबाई आंबेडकर वस्तीगृह आय. टी. आय. येथे ०७ सप्टेंबर रोजी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संजय एम देशमुख ( संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष) मा. दिपक देशमुख ( संघटन व संपर्क प्रमुख ), मा. भगीरथ बदर ( महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख ) मा. शिवशंकर सोनुने ( संपर्क प्रमुख) मा. दिलीप जी बनकर ( जिल्हा अध्यक्ष) प्रमोद अंभोरे (जिल्हा सचिव), प्रसिद्धी प्रमुख शेख अझहर यांच्या सह यावेळी मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार रवी साबळे मिळाल्या बद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत असून अभिनंदन केले जात आहे.

