परभणी ( समाजहीत न्यूज वृत्तांत ) कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी या महाविद्यालयात दि.४ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर २०२३ दरम्यान महाविद्यालयाच्या आक्यूएसी आणि विचार समन्वयमंच च्या वतीने 'विद्या शाखा विकास कार्यक्रम' (F D P ) चे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रा.डॉ. प्रशांत वक्ते ( ज्ञानोपासक महाविद्यालय ,परभणी ) यांनी एफ.डी.पी.चे उदघाटन करत 'प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाची ओळख' करून दिली. दि.५ सप्टेंबर रोजी ज्ञानोपासक महाविद्यालय परभणीचे प्राचार्य डॉ. शेख बाबर यांनी 'पी.एम. उषा. अंतर्गत विविध घटक आणि उपक्रम' या विषयावर मार्गदर्शन केले. दि.६ सप्टेंबर रोजी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांनी 'परिस-स्पर्श' योजनेची माहिती दिली. दि. ७ सप्टेंबर रोजी डॉ. केशेट्टी यांनी अद्ययावत NAAC च्या अनुषंगाने नवीन एस. एस. आर. आणि एस ओ.पी.च्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. ८ सप्टेंबर रोजी डॉ. रोहिदास नितोंडे उप प्राचार्य श्री. शिवाजी महाविद्यालय परभणी यांनी 'नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रम व श्रेयांक आराखडा' या विषयाच्या अनुषंगाने सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोप ९ सप्टेंबर रोजी समारोपप्रसंगी कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाचे, प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले यांनी शिक्षणाची फलश्रुती या विषयाच्या अनुषंगाने उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी नविन शैक्षणिक धोरण समजावत उच्च शिक्षणात होणारे बदल सांगून माहिती आणि तंत्रज्ञानाचा अध्ययन आणि अध्यापनात आवश्यक असलेला वापर याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक, आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
