> महिलेची तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार <
मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील मौ. वझुर खु. येथील महिला निर्मला दिपक वाव्हळे यांची प्रसूती ०६ जून २०२३ रोजी झाली असता प्रसूती कार्यकाळात शासनाची मिळणारी बुडीत मजुरी रक्कम अद्याप पर्यंत त्यांना मिळाली नसल्याने त्यांनी याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. शासनाचा वतीने मातृत्वा बाबत आरोग्य विभागा अंतर्गत अनेक योजना गर्भवती महिलांसाठी राबवल्या जातात मात्र लाभार्थ्यांना अनेक वेळा निधीची प्रतीक्षा करावी लागते. तसेच ग्रामीण भागातील महिला गरोदरपणात ही शेतात कामाला जातात त्यामुळे त्यांना हवा तसा अराम मिळत नाही आणि शेतात गेले तर मजुरी मिळत नाही याच अनुषंगाने गर्भवती महिलांची हेळसांड होऊ नये आणि त्यांची प्रसूती दवाखान्यात उत्तम प्रकारे सुविधाजनक व्हावी या उद्देशाने मानव मिशन योजने अंतर्गत महिलांना बुडीत मजुरी मिळत असते परंतु वझुर खु. येथील महिला निर्मला दिपक वाव्हळे यांना अद्याप ही शासनाकडून मिळणा ऱ्या बुडीत मजुरी योजनेचा लाभ मिळाला नाही सदरील या बाबत संबंधित अशा वर्कर आणि रामपुरी. बु. येथील आरोग्य केंद्रात विचाराणा केली असता कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देत असून सदरील बाबतची सखोल चौकशी करुन बुडीत मजुरीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी यावेळी निर्मला दिपक वाव्हळे यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे.
