परभणी(प्रतिनिधी शेख अझहर) : स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती राजर्षी शाहू महाराज संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराशी बांधिलकी पत्करून देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या धर्मनिरपेक्ष समाजवादी विचारधारेतून त्याच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा संसद रत्न डॉ. खासदार फौजिया खान तहसील खान यांच्या समर्थ नेतृत्वाखाली तसेच पक्षाचे जिल्ह्यातील व शहरातील सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी सदस्य व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून पक्षाच्या ध्येय धोरणानुसार सर्व जाती-धर्मांच्या सार्वजनिक विकासासाठी आम्ही भविष्यात कार्यरत राहू अशी ग्वाही राष्ट्रवादी भवन येथे नियुक्ती झाल्यानंतर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पहिल्याच बैठकीत नवनिर्वाचित पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष जाकीर अहमद उर्फ जाकीर खान लाला व शहर जिल्हा कार्याध्यक्ष विकास प्रभाकर लंगोटे यांनी दिली.
या बैठकीस संसद रत्न खासदार डॉ फौजिया खान तहसील खान, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार विजयराव गव्हाणे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेख अहमद भाई, रमाकांत कुलकर्णी आदींनी मार्गदर्शन केले त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते तहसील खान यासीन खान, अर्बनचे शहर जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक प्रभाकर अण्णा लंगोटे, पक्षाचे माजी नगरसेवक आर्थिक इनामदार अखिल काझी, पाशाबाई कुरेशी, नदीम काझी यांच्यासह पक्षाचे माजी नगरसेवक तसेच युवा नेते रितेश काळे यांच्यासह पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी व पक्षाचे युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नावर न्याय मिळवून देण्यासाठी व शहरातील मूलभूत सुख सुविधा सर्व जनतेस उपलब्ध करून देण्यासाठी लढा उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच कंत्राटी पद्धतीने होणारी भरती रद्द करावी शासनाने जो खाजगी कंपन्यांना सरकारी शाळा खाजगी तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतलेला आहे तो मागे घेण्यात यावा, बेरोजगार युवक युवतींना न्याय मिळवून देता यावा तसेच भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी व त्याच्या बचावासाठी प्रामाणिकप प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.संस्थापक संपादक :प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821



