परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ काळी कमान वसमत रोड येथे शिव-शक्ती परिक्रमा गजर भक्तीचा निमित्त आज दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे या आले असता त्यांचा लींबाजीराव भोसले (अण्णा) माजी परभणी जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ढोल ताशा, फटाके व शाल श्रीफळ, भव्य पुष्पहार घालून भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी लींबाजीराव भोसले (अण्णा) माजी परभणी जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी, ज्ञानोबा कालनंदे, गजानन बोकारे, सादिक आली इनामदार, बाळू चव्हाण, सोनवले साहेब, प्रशांत शिरुरकर व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821




