उस्मानाबाद ( समाजहित न्यूज वृतांत) जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात सावरगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये भारतीय बौद्ध महासभा उस्मानाबाद यांच्या वतीने दिनांक 1 सप्टेंबर पासून बालसंस्कार शिबीरास भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्षा विजयमाला धावारे, पर्यटन उपाध्यक्ष विश्वास भाऊ पांडागळे, कोषाध्यक्षा राजश्री कदम, महिला जिल्हा उपाध्यक्षा शिलाताई चंदणशिवे, जिल्हा संस्कार सचिव कुमार ढेपे, शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक गुणवंत सोनवणे, ॲड. बाबासाहेब वडवे, तालुका संस्कार प्रमुख राकेश जेटीथोर, यांच्या मार्गदर्शनाने सुरुवात करण्यात आली आहे. दहा दिवसीय या बालसंस्कार शिबिरामध्ये धम्म अभ्यासकांचे मार्गदर्शन लाभणार आहे या वेळी समता सैनिक दलाचे जवान अनंता कांबळे, सुनील फडके, बाजीराव साबळे, सोमनाथ फडके, नितीन फडके, बापू डोलारे, विकास डोलारे, विनोद डोलारे, संजय फडके, बाळासाहेब फडके, भिमराव फडके, रोहन मस्के आदी उपस्थित होते. या बालसंस्कार शिबिरामध्ये 22 बालकांनी सहभागी घेतला आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
