परभणी (प्रतिनिधी शेख अझहर) शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या परभणी जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय एम देशमुख यांच्या हस्ते दिनांक 7 सप्टेंबर रोजी पार पडले, तदनंतर विविध मान्यवरांच्या नियुक्ती कार्यक्रम, तसेच पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात समाजासाठी सतत कार्यशील असणारे दयावान सरकार चे मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय एम देशमुख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते "समाज रत्न पुरस्कार 2023" सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला केन्द्रीय उपाध्यक्ष प्रदिपजी खाडे, कर्नाटक राज्य संपर्क व संघटन प्रमुख सरोजिनी आर्गे, विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख पंजाबरावजी देशमुख, बुलढाणा जिल्हाप्रतिनिधी विश्वप्रभात वृत्तपत्र रामरावजी देशमुख, महाराष्ट्र राज्य संघटन, संपर्क तथा प्रसिध्दी प्रमुख भगिरथजी बद्दर, शिवसेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अनिताताई सरोदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.दयावान सरकार मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड "समाज रत्न पुरस्कार 2023" ने सन्मानित
September 09, 2023
0
परभणी (प्रतिनिधी शेख अझहर) शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या परभणी जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय एम देशमुख यांच्या हस्ते दिनांक 7 सप्टेंबर रोजी पार पडले, तदनंतर विविध मान्यवरांच्या नियुक्ती कार्यक्रम, तसेच पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात समाजासाठी सतत कार्यशील असणारे दयावान सरकार चे मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय एम देशमुख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते "समाज रत्न पुरस्कार 2023" सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला केन्द्रीय उपाध्यक्ष प्रदिपजी खाडे, कर्नाटक राज्य संपर्क व संघटन प्रमुख सरोजिनी आर्गे, विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख पंजाबरावजी देशमुख, बुलढाणा जिल्हाप्रतिनिधी विश्वप्रभात वृत्तपत्र रामरावजी देशमुख, महाराष्ट्र राज्य संघटन, संपर्क तथा प्रसिध्दी प्रमुख भगिरथजी बद्दर, शिवसेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अनिताताई सरोदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.