कर्तव्यदक्ष क्रीडा अधिकारी रोहन औंढेकर यांचा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने सत्कार
परभणी ( समाजहित न्यूज वृत्तांत ) परभणी येथे बदली होऊन आलेले क्रीडा अधिकारी रोहन औंढेकर यांनी शासकीय सेवेत असताना विविध शासकीय योजनांची योग्य पद्धतीने कुठल्याही आमिषाला बळी न पडता वंचित घटकांपर्यंत पोहोचवून त्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम करत असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा शाखा परभणी व माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी यांच्या वतीने दिनांक 23 जून 2025 रोजी लोक स्वतंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्यालय डॉक्टर आंबेडकर नगर आयटीआय कॉर्नर जिंतूर रोड परभणी येथे त्यांच्या कार्याचा गुणगौरव करून पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला आहे. क्रीडा अधिकारी रोहन औंढेकर हे शहरातील माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वस्तीग्रह परभणी या वस्तीगृहास भेटी दरम्यान हा सत्कार करण्यात आला आहे. सत्काराला उत्तर देताना क्रीडा अधिकारी रोहन औंढेकर म्हणाले की " विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांचे क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून ज्या काही सोयीसुविधा विद्यार्थ्यांना देता येतील त्या देऊन क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहे". तसेच दिलीप बनकर, देवानंद वाकळे, प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी आपल्या मनोगतातून कर्तव्यदक्ष क्रीडा अधिकारी रोहन औंढेकर यांच्या कार्याचे कौतुक करून परभणी मध्ये रुजू झाल्याबद्दल त्यांना अभिनंदन करून पुढील कार्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी सचिव प्रमोद अशोकराव अंभोरे, साप्ताहिक वैभव ज्वालाचे संपादक तथा माजी विशेष कार्यकारी अधिकारी देवानंद वाकळे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र धबाले, प्रकाश पंडित, नंद साहेब, ज्येष्ठ पत्रकार युनूस कच्ची, समाजहित न्युज चे व्यवस्थापक प्रतिनिधी संदीप वायवळ, शिवाजी कोकाटे, वार्ताहर रामसिंग अंभोरे, प्रकाश वडधुतीकर , पत्रकार उमेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

