परभणी, दि. 19 (समाजहित न्यूज वृत्तांत) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विविध पदाधिकारी, नागरिक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*-*-*-*-*

