डोंबिवली कल्याण (कार्य. संपादक ऍड. सुभाष अंभोरे ) येथील रिपाइं आठवले शहर अध्यक्ष गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले समाजसेवक लोकनेते दिवंगत अंकुश शेठ गायकवाड यांची 63 वी जयंती दिवंगत अंकुश गायकवाड फाऊंडेशन यांच्या वतीने प्रथम मध्यवर्ती कार्यालय डोंबिवली येथे साजरी करण्यात आली. या वेळी सर्व प्रथम बुद्ध वंदना घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले तसेच दिवंगत अंकुश गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत अंकुश शेठ यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे गुणगौरव करत त्यांच्या सोबत लाभलेला सहवास व अठवणीला उजाळा दिला.
अंकुश शेठ हे तथागत गौतम बुद्धांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अडल्या - नडल्यालानां सढळ हाताने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली असे मत ॲड. सुभाष अशोकराव अंभोरे यांनी व्यक्त केले. तर अंकुश शेठ हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सुद्धा समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत रस्त्यावर उतरले होते असे मत रिपाइं आठवले पक्षाचे ठाणे प्रदेश उपाध्यक्ष तथा झोपडपट्टी कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष माणिक उघडे यांनी मांडले. स्वाभिमानी रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण अंभोरे यांनी अश्या सामजिक कार्यक्रमानिमित्त सर्वांनी एकत्र आल्यानंतर जसे अंकुश शेठ हे सामाजिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असत तसेच समाजाच्या न्याय हक्कासाठी आक्रमक भूमिका घेत असे त्याच प्रमाणे आपण सर्वांनी समाजाच्या हितासाठी एकविचरणे निळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन काम करावे असे आवाहन केले. समाधान तायडे यांनी आपल्या भाषणात अंकुश शेठ यांच्या सोबतच्या मैत्री संबंधातील अनुभव सांगितला तसेच शेवटच्या दिवसाचे व क्षणाचे काही किस्से सांगितले. गौतम हनवते यांनी पँथर जगनदादा गायकवाड ते लोकनेते अंकुश गायकवाड यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता रिपब्लिकन चळवळी द्वारे समाजासाठी केलेला संघर्ष व त्याग याची माहिती देत त्यांच्या पश्चात गायकवाड कुटुंबाच्या संघर्षाची आठवण कायम लक्षात राहावी यासाठी अंकुश शेठ यांचे पुतणे रवि गायकवाड यांच्या पाठीशी समाजाने ठाम पणे उभे राहून डोंबिवलीत समाजाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी अशी भावना व्यक्त केली. शेवटी गौतम वाकचौरे काका यांनी अंकुश शेठ यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या स्मरणार्थ 'दिवंगत अंकुश गायकवाड फाऊंडेशन डोंबिवली' या सामाजिक संस्थीची स्थापना केली असून त्याचे अध्यक्ष म्हणून रवि गायकवाड यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे अशी माहिती दिली आणि अंकुश शेठ यांची पहिली 63 वी जयंती याच फाऊंडेशनच्या वतीने साजरी केली जात असून जयंती निमित अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. गायकवाड कुटुंबीयांनी केलेल्या सामाजिक वारसा मी यापुढे देखील कायम ठेऊन नेहमीच सामाजिक कार्यासाठी मी अग्रेसर राहून अविरत समाजकार्य मी करत राहील असे रवि गायकवाड यांनी वचन दिले.तसेच अंकुश शेठ यांच्या सोबत खांद्याला खांदा लाऊन समाजसेवा करणारे त्याचे सहकारी कार्यकर्ते यांची गायकवाड फाऊंडेशन मधील कार्यकारणी मंडळात विविध पदांवर नियुक्ती केली त्यात
रवि मंगल गायकवाड - अध्यक्ष
ॲड. सुभाष अशोकराव अंभोरे - उपाध्यक्ष
जितू गायकवाड - उपाध्यक्ष
गौतम वाकचौरे काका - सचिव
समाधान तायडे - सहसचिव
मंगेश कांबळे - खजिनदार
वसंत टेकाळे - सल्लागार
या नांवाची यादी जाहिर केली असून यात डोंबिवली शहरातील प्रत्यक प्रभागातून सदस्य/समिती/पदाधिकारी/स्वयंसेवक/कर्मचारी यांची नियुक्ती करून गायकवाड फाऊंडेशनच्या माध्यमातून यापुढे सामाजिक कार्य करून न्याय - हक्कासाठी गायकवाड स्टाईलने आक्रमक भूमिका घेतली जाईल असे जाहिर केले. यावेळी शहरामध्ये मोठ्याप्रमाणात अन्नदान केले. यावेळी रवि गायकवाड, ॲड. सुभाष अंभोरे, गौतम वाकचौरे, लक्ष्मणराव अंभोरे, माणिक उघडे, समाधान तायडे, विकास खैरनार, वैशाली सावर्डेकर, वसंत टेकाळे, हरिश्चंद्र म्हात्रे, चंद्रकांत वाढवे, सतीश पवार, रमेश धाबे, चंद्रकांत अहिरे, जयेश जोशी, राजु दोंदे, उत्तम बनसोडे, पिराजी काकडे, छोटे मास्टर, माणिकराव काकडे, समाधान खंदारे, मोहन मोरे, विजय शेळके, अमोल अंभोरे, बंडू धबाले, गौतम हनवते, अविनाश जाधव, सागर कसबे, गणेश गायकवाड, मदन चातसे, भरत जवंगर, अजित खंडागळे, नितेश गायकवाड, रुपेश गायकवाड, संजय पवार, तुकाराम पवार, हरिश्चंद्र कांबळे, भास्कर शेळके, जयेश ठाकूर, चंद्रकांत थुकरुल आदी डोंबिवली शहरातील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव व महिला उपस्थित होते.



