परभणी, दि. ११ (समाजहित न्यूज वृत्तांत)— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदिंसह तालुक्यातील सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत सातबारा संगणकीकरण, ई-पीक पाहणी, ॲग्रीस्टॅक प्रकल्प, वसुली प्रकरणे, कोर्ट डिक्रीची अंमलबजावणी आणि अन्य विषयांचा आढावा घेण्यात आला.
***


