जिल्ह्यातील अवैद्य धंदे करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई
परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) जिल्ह्यातील चालू असलेल्या अवैद्य धंदे बंद करण्याच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्ह्याच्या वतीने, दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी पोलीस अधीक्षक परभणी मा.रवींद्रसिंह परदेशी, परभणी जिल्हाधिकारी साहेब, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेट देऊन परभणी जिल्ह्यातील अवैद्य धंदे जसे की अवैद्य दारू, मटका , गुटखा सर्रास विक्री होत असल्याने ते तात्काळ बंद करून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. सदरील निवेदनाची तात्काळ दखल घेऊन, दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी परभणी पोलीस अधीक्षक मा. रवींद्रसिंग परदेशी यांच्या आदेशावरून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मा.यशवंत काळे यांच्या नेतृत्वात मासरेड करून अवैद्य देशी दारू , हातभट्टी व रसायन आसे एकूण 3060 लिटर दारूचा एकूण 2,21,410 रुपयाच्या मुद्देमाल हस्तगत करून 38 आरोपी वर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील एकूण 41 पोलीस अधिकारी व 113 पोलीस अंमलदार यांनी मिळून ही कार्यवाही केली आहे. निवेदनाचे तात्काळ दखल घेऊन दोषींनवर कार्यवाही केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत जिल्हाध्यक्ष (उत्तर ) तुकाराम भारती , परभणी तालुका अध्यक्ष (उत्तर) प्रमोद अशोकराव अंभोरे , युवा जिल्हाध्यक्ष (उत्तर) गणेश गाढे, युवा जिल्हा सचिव (उत्तर) प्रा. बाळासाहेब गाढे, परभणी तालुकाध्यक्ष (दक्षिण ) कमलेश ठेंगे, परभणी तालुका महासचिव(दक्षिण) राहुल पवळे, परभणी तालुका उपाध्यक्ष (उत्तर) शेख कलीम, युवा जिल्हा उपाध्यक्ष (उत्तर ) मुजफ्फर खान, जिल्हा महासचिव (उत्तर) गौतम रणखांबे, वंचितचे जेष्ठ कार्यकर्ते अशोक वायवळ, आदींच्या वतीने पोलीस प्रशासनाने कारवाई केल्याबद्दल अभिनंदन करत आभार मानले.

